breaking-newsराष्ट्रिय

माझी जगण्याची इच्छा नाही – सुनंदा पुष्कर

  • मृत्यूपूर्वी पती थरूर यांना पाठवला ई-मेल 

नवी दिल्ली – सुनंदा पुष्करने तिच्या संशयास्पद मृत्यूच्या नऊ दिवस आधी पती आणि कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांना एक ई-मेल पाठवला होता. त्यात तिने माझी जगण्याची इच्छा नाही. मी मृत्यूसाठी प्रार्थना करते, असे म्हटले होते. तिच्या या ई-मेलचा स्वीकार मृत्यूपूूर्वीचा जबाब म्हणून केला जावा, अशी विनंती आज दिल्ली पोलिसांनी येथील न्यायालयात केली.

दक्षिण दिल्लीतील एका लक्‍झरी हॉटेलच्या रूममध्ये सुनंदा 17 जानेवारी 2014 च्या रात्री मृतावस्थेत आढळली. तिच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी सुमारे 3 हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात थरूर यांना एकमेव आरोपी करण्यात आले आहे. याप्रकरणी आज येथील न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने थरूर यांना आरोपी म्हणून बोलवायचे का यावरील निर्णय 5 जूनपर्यंत राखून ठेवला आहे.

दरम्यान, सुनंदाचा मृत्यू विषप्राशनाने झाला. तिच्या रूममध्ये अलप्राक्‍सच्या 27 गोळ्या सापडल्य. मात्र, तिने किती गोळ्या खाल्ल्या ते स्पष्ट होऊ शकले नाही, असे पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले. यावेळी युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी म्हटले की, क्रूरता सहन करावी लागल्यामुळेच सुनंदाने आत्महत्या केली असावी. आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जाण्याचे हे प्रकरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button