breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माझी खुर्ची समाजाच्या बरोबर हवी, समाजाच्या वर नको – छत्रपती संभाजीराजे

नवी मुंबई | मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईतील माथाडी भवनात आज होत असलेल्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. या बैठकीत छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे पहिल्यांदाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र येणार होते. मात्र ऐनवेळी उदयनराजे भोसले यांनी बैठकीला येणे रद्द केले. तर बैठकीत भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी त्यांनी व्यासपीठावर ठेवलेल्या खुर्चीवर न बसता समन्वयकांसह खालीच बसणे पसंत केले.

ते म्हणाले, ‘माझीसुद्धा खुर्ची समाजाच्या बरोबर हवी, समाजाच्या वर नको.’ तसेच ‘आपण राजे घराण्याचा सन्मान राखलात, आमच्यासाठी दोन मोठ्या खुर्च्या ठेवल्यात. मात्र मी त्यावर बसणार नाही. मी माझ्या समाजासोबतच खाली बसणार’, अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली.

यानंतर संभाजीराजे यांनी आयोजकांना आपल्याला अशाप्रकारे वेगळी वागणूक देऊ नये अशी विनंती करत म्हटले, ‘मी इथे येतोय म्हणजे मी समाजाचा घटक म्हणून येतो. ज्यावेळी मानपान घ्यायच्या त्यावेळी पुढाऱ्यांकडून आम्ही तो बरोबर घेतो.’ तसेच यावेळी संभाजीराजे यांनी उपस्थितांना राजर्षी शाहू महाराज यांच्यासंदर्भातील एक किस्सा सांगितला. छत्रपती शाहू महाराज मराठा समाजाच्या एका कार्यक्रमात गेले होते.

त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मी तुमचा सेवक असल्याचे सांगितले. मी छत्रपती घराण्यातील असलो, मी राजे जरी असलो तरी मी समाजाचा सेवक असल्याचे सांगत राजर्षी शाहू महाराज खाली बसल्याची आठवण संभाजीराजे यांनी यावेळी दिली. नवी मुंबईच्या माथाडी भवनात माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button