breaking-newsमहाराष्ट्र

माझा ईव्हीएम मशीनवर विश्वास-अजित पवार

माझा ईव्हीएम मशीनवर विश्वास आहे,असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी येथे केले. काँग्रेस-राष्ट्रवादी सह अनेक विरोधी पक्ष ईव्हीएम मशीनच्या सत्यत्याबाबत सातत्याने शंका उपस्थित करत असताना पवार यांनी मात्र ईव्हीएम मशीनच्या क्लीन चिट दिली आहे.
याचवेळी त्यांनी कर्नाटक , पंजाब आणि अलीकडचे पाच राज्यांचे निकाल याच मशीनमधून आले आहेत. ते काँग्रेससह विरोधकांना अनुकूल ठरले आहेत, असे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले.

ईव्हीएमची काळजी करू नका, योग्य चिन्हांचे बटण दाबा मग भाजपच ईव्हीएम बदला असे म्हणू लागेल, असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला. इचलकरंजी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मदन कारंडे यांच्या बालाजी नागरी सहकारी पतसंस्थाच्या रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारंभात पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. काँगेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे , राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ ,जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील यद्रावकर, उदय लोखंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी ४० जागांचे वाटप पूर्ण झाले आहे .उर्वरित ८ जागांच्या वाटपावर चर्चा येत्या आठवड्यात होणार आहे , असेही त्यांनी स्पष्ट केले.  सध्याचे सरकार शेतकरी विरोधात आहे, अशी टीका करून सरकारच्या कामगिरीवर एकही घटक समाधानी नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला राम आठवतो. हनुमानाची जात काढली जाते. कारण यांच्या डोक्यात कायम जातीयतेचे किडा वळवळत असतो, असा प्रहार त्यांनी केला. मुख्यमंत्री ,महसूल मंत्री , वस्त्रउद्योग मंत्री नुसता फसव्या घोषणा करतात.कसलीही कृती त्यांच्याकडून होत नाही. राज्यातील वस्त्रउद्योग धंद्याची या सरकारने वाट लावली आहे.केंद्रातले सरकार व राज्यातले सरकार हे फसवे आहे,असा आरोप पवारांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button