breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

माजी विरोधी पक्षनेत्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला लावला कोट्यावधीचा चूना

  • करसंकलन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, अधिका-यांना मिळतेय करातून आर्थिक मलिदा
  • सामान्य नागरिकांवर जप्तीची कारवाई अन्ं पालिकेच्या आजी-माजी पदाधिका-यांना कारवाईतून सूट

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागातील वरिष्ठ अधिका-यांच्या अक्षम्य दुर्लक्षामूळे 16 विभागीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी महापालिकेला कोट्यावधी रुपयाचा चुना लावत आहे. शहरातील हजारो मिळकतींचा नोंदणी न करता अधिकारी व कर्मचा-यांना घरबसल्या लाखो रुपयांचा आर्थिक मलिदा मिळू लागला आहे. त्यामुळे करसंकलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी हजारो अनधिकृत आणि जून्या मालमत्तेच्या नोंदणी करण्यास जाणिवपुर्वक टाळाटाळ करीत आहेत. याबाबत चिंचवडच्या सर्व्हे नं. 129 मधील एका माजी विरोधी पक्षनेत्यांच्या चार मजली आरसीसी इमारत असलेल्या 48 खोल्यांची गेल्या दहा वर्षापासून महापालिकेकडे नोंद नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. हे महाशय, महापालिकेच्या सोयी-सुविधांचा लाभ घेवून तेथील भाडेकरु कडून दरमहा लाखो रुपयाचे भाडे वसूल करतात. त्यातील काही रक्कम अधिकारी व कर्मचा-यांना खारीचा वाटा मिळत आहे. त्यामुळे मालमत्ता मिळकतकरापोटी माजी विरोधी पक्षनेत्यांने कोट्यावधी रुपयांचा महापालिकेला लावल्याचे दिसत आहे. 

चिंचवड येथील सर्व्हे नंबर 129 मधील पाण्याच्या टाकीजवळील बिजलीनगर याठिकाणी एका माजी विरोधी पक्षनेत्यांचे सन 2008 मध्ये चार मजली आरसीसी बांधकाम करुन 48 खोल्या भाड्याने दिल्या आहेत. त्या इमारतीला महापालिकेच्या सर्व सोयी-सुविधा पुरविल्या आहेत. त्या इमारतीतील भाडेकरु कडून दरमहा लाखो रुपये वसूल होत आहे. मात्र, त्या इमारतीची महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे कोणतीही नोंदणी झालेली नाही. त्याची टॅक्स पावतीही दिलेली नाही.

मागील दहा वर्षापासून करसंकलन विभागातील वरिष्ठ अधिका-यांसह काही कर्मचा-यांनी माजी विरोधी पक्षनेत्यांवर मेहेरबानी दाखविली आहे. त्या इमारतीवर कोणताही कर लावलेला नाही. तसेच त्या इमारतीचा कर्मर्शियल कर आकारणी होणे गरजेचे होते. परंतू तसे काहीही झालेले नाही. मात्र, एखाद्या सर्व सामान्य नागरिकांचा सहा महिन्यांचा कर थकला तर महापालिका नोटीस काढते. दवंडी पिटवते. जप्ती पुर्व नोटीस देते. शिवाय जप्तीची कारवाई करण्यात येते. परंतू, या महाशयावर कधीही कारवाई झालेली नाही.

तसेच काही वर्षापुर्वी त्यात इमारतीत सिलेंडर स्फोट होवून त्यात दोन व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यावेळीही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. तसेच महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने देखील पाणी कनेक्शन बेकायदेशीरपणे दिले आहे. त्या इमारतीची पाणीपट्टी भरली जात नाही. तेथील 48 भाडेकरांना महापालिका फुकट पाणी देत आहे. तेथील भाडे करु कडून पाणी पट्टी व वीज बिलाची वसुली केली जात आहे.

याशिवाय 48 खोल्या असलेल्या इमारतीत दोन मीटर बसविलेले आहेत. तेथील वीज पुरवठ्याचे बील देखील दोन ते पाच हजार रुपये एवढे दरमहा येत आहे. या बिलाचे देखील गमक काहींना कळत नाही. एकाच मीटरमधून अनेक घरांना वीज दिल्याने बेकायदेशीर कृत्य केले आहे.

दरम्यान, महापालिकेच्या करसंकलन विभाग, पाणी पुरवठा आणि महावितरण विभागाचे अधिकारी संबंधित माजी विरोधी पक्षनेत्यांच्या इशा-यावर चालत आहेत. महापालिकेचे पाणी आणि मिळकत कराचे लाखो रुपये महसूल बुडविला जात आहे. त्यामुळे याप्रकरणी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी अॅड सुनिल वाल्हेकर यांनी केली आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button