breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

माजी मंत्री, आमदार विनयराव कोरे यांना मातृशोक

कोल्हापूर |प्रतिनिधी

तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षा व मा मंत्री आमदार विनयराव कोरे ( सावकर) यांच्या मातोश्री श्रीमती शोभाताई विलासराव कोरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

वारणा साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती शोभाताई कोरे यांचे आज (सोमवार) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू होते. जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री आणि आ. विनय कोरे यांच्या त्या मातोश्री होत.

सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या समाजकारणाचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला. वारणा बझार, वारणा महिला समूह, वारणा भगिनी मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली. विशेषतः महिला सबलीकरणामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. शोभाताई कोरे यांच्या निधनाने वारणानगर परिसरासह पन्हाळा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button