breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केलेल्या 6 आरोपींना 15 हजार रुपये जातमुचलक्यावर जामीन मंंजुर

मुंबई: मुंबईमध्ये माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केल्याप्रकरणी 6 आरोपींना आज (15 सप्टेंबर) पुन्हा न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली होती. मात्र त्यानंंतर लगेचच बोरिवली कोर्टातुन या सहाही आरोपींंना प्रत्येकी 15 हजार रुपयांंवर जामीन मंंजुर करण्यात आलेला आहे. याशिवाय पोलिसांंच्या सुचनेनुसार त्यांंना कोणत्याही पोलिसांंसमोर उपस्थित राहावे लागेल असेही सांंगण्यात आले आहे.

काल रात्री समता नगर पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्हांमध्येच कलम 452 ची भर घालत आरोपींना पुन्हा अटक करण्यात आलेली होती. आज सकाळी त्यांना बोरिवली येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आले त्यावेळेस न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टुन सोशल मीडीयात व्हॉट्सअ‍ॅप द्वारा शेअर केलेल्या मदन शर्मा यांंना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे कमलेश कदम आणि 5 अन्य शिवसैनिकांवर आरोप आहेत. 12 सप्टेंबरला याप्रकरणी पहिल्यांंदा सहा जणांना अटक झाली होती त्यानंतर लगेजच जामीनावर त्यांची सुटका झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button