breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माजी नगरसेवक मधुकर बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्दांचा सन्मान

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक मधुकर बाबर यांचा वाढदिवस १८ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त कोरोना योध्दांचा सन्मान तसेच अनाथ व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.सकाळी ११ वाजता डॉन बस्को अनाथ आश्रम काळभोरनार येथे ११० अनाथ व्यक्तींना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.

वाचा :-पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

तसेच सायंकाळी ७ वाजता हॉटेल क्रियाड थरमेक्स चौक चिंचवड येथे कोरोना योध्दांचा सन्मान करण्यात आला. मेगा व्हिजनचे डॉ.केदार भाटे, स्टार हॉस्पीटलचे डॉ. प्रमोद कुबडे, स्टरलिंग हॉस्पीटलचे डॉ. अभिषेक करमळकर, सूर्या हॉस्पीटलचे डॉ.दत्तात्रय सुर्यवंशी, लोकमान्य हॉस्पीटलचे डॉ.जयवंत श्रीखंडे, आस्था क्लिनीकचे डॉ.स्वाती देशमुख, क्रष्णा डायग्नेस्टीकचे अध्यक्ष श्री.राजेंद्र मुथा, अग्रेशेन ट्रस्टचे विश्वस्थ श्री.भिमसेन अगरवाल, शामशेठ मेघराजाजी, पर्यावरण अधिकारी अमोल गोरखे, राष्ट्रतेज तरूण मंडळाचे अध्यक्ष नाना काळभोर, जगदंब प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मनिष काळभोर, शिवसेना शाखा प्रमुख सागर पुंडे, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार गुप्ता, म.न.पा.सफाई कामगार मुकादम प्रमोद आंबुपकर, दत्तात्रय हाटकर, राकेश गायकवाड, वायसीएम रुग्णालय युनिस पगडीवाले, बबन काजरेकर, फिरोज मुलानी, संगिता भालेराव या कोविड योद्धांची लॉकडाऊन काळात आपल्या प्राणाची बाजी लाऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कामगीरी केल्याबद्दल त्यांना शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, माजी खासदार गजानन बाबर, जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांच्या शुभहस्ते कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

या कार्यक्रमास अमित गोरखे (सचिव भा.ज.पा.), केशव घोळवे (उपमहापौर), योगेश बाबर (शिवसेना शहर प्रमुख), उर्मिला काळभोर (शिवसेना महिला शहर संघटीका), अनुराधा गोरखे (नगरसेविका), सरिता साने (शिवसेना महिला संघटीका पिंपरी विधानसभा), नाना काळभोर (शिवसेना विभाग प्रमुख) उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. व आभार प्रदर्शन योगेश बाबर यांनी मानले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button