breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पालिकेकडून 8 कोटी 73 लाखांचे अर्थसहाय

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवडमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणा-या मागासवर्गीय कल्याणकारी योजनेंतर्गत एकूण 19 हजार 285 पात्र विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांचे अर्थसहाय करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत हा लाभ देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत शहरातील इयत्ता पाचवी ते दहावीमध्ये शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्थसहाय दिले जाते. 2015-16 ते 31 जानेवारी 2021 अखेर माता रमाई आंबेडकर इयत्ता पाचवी ते दहावीमध्ये शिकत असणा-या मागावसर्गीय विद्यार्थ्यांना अर्थसहाय योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यातील एकूण 19 हजार 285 पात्र अर्जदारांना पालिकेने आजअखेर 8 कोटी 73 लाख 73 हजार रुपयांचा लाभ दिला आहे, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button