breaking-newsमनोरंजन

महेश बाबू-कतरिनाची जोडी झळकणार?

तेलुगू चित्रपट निर्माता बॉलिवूडमधी आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ आणि सुपरस्टार महेश बाबू यांना घेवून एका चित्रपटाची निर्मिती करू इच्छित आहे. यापूर्वी कतरिनाने दोन तेलुगू चित्रपटात काम केलेले आहे. या चित्रपटास कतरिनाने होकार दर्शविल्यास 10 वर्षानंतर ती तिस-या तेलुगू चित्रपट झळकेल.

बीग बजेट असलेल्या या चित्रपटाचे टायटल अद्याप निश्‍चित करण्यात आले नाही. पण डायरेस्टर या चित्रपटात महेश आणि कतरिनाला साईन करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. या चित्रपटाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. पण महेश बाबू यांनी चित्रपटासाठी सहमति दर्शविली आहे. आता फक्‍त कतरिनाने होकार दर्शविण्याचे बाकी आहे.

चित्रपट निर्मात्याच्या मनासारखे सर्वकाही जुळून आल्यास ठिक 10 वर्षानंतर कतरिनाचा हा तिसरा तेलुगू चित्रपट ठरेल. 2004मध्ये व्येंकटेश दुग्गुबती यांच्या “मल्लिश्‍वरी’ या चित्रपटातून तिने तेलुगू चित्रपटसृष्टीत पर्दापण केले होते. त्यानंतर नंदमूरी बालकृष्णसोबत “अलारी पिडुगु’त तिने काम केले होते. दरम्यान, कतरिना सध्या आपल्या आगामी “भारत’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात ती सलमान खानसोबत झळकणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button