breaking-newsUncategorizedपुणे

महिलेला मारहाण ; बिल्डरावर गुन्हा दाखल करण्यास पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन

पुणे – महिला उद्योजिका काकोली मंडल यांना मारहाण व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कुमार डेव्हलपर्सचे मालक ललितकुमार जैन, सॉलिटर कंपनीचे मालक अतुल चोरडिया, व्हीटीपी ग्रुपचे मालक संतोष जैन, ट्रायकॉन कंपनीचे ब्रिजेश सिंग यांच्यासह अन्य लोकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन युवा मोर्चा व समविचारी सामाजिक संघटनांनी सोमवारी (दि. १७) पुण्यातील पाषाण येथील ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

कुमार डेव्हलपर्सच्या वतीने मांजरी खुर्द येथे कुलनेशन या नावाने गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. हे काम महिला उद्योजिका काकोली मंडल यांच्या ए. एम. सी. कॉन्ट्रॅक्टर्स यांना देण्यात आले होते. परंतु, केलेल्या कामाचे पैसे अदा करण्यासाठी कुमार डेव्हलपर्सचे मालक ललितकुमार जैन यांनी वारंवार टाळाटाळ केली. तसेच ए. एम. सी. कॉन्ट्रॅक्टर्सच्या कामागारांना वारंवार धमकावणे, खोटे अदखलापत्र गुन्हे दाखल करणे व इतर माध्यमातून त्रास देण्यास सुरूवात करण्यात आली. त्यामुळे काकोली मंडल यांनी याप्रकरणी १७ एप्रिल २०१८ रोजी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. परंतु, पोलिसांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही.

दरम्यान, रिपब्लिकन युवा मोर्चा व समविचारी सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी पुण्यातील पाषाण येथील ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करून कुमार बिल्डर्सचे मालक ललितकुमार जैन, सॉलिटर कंपनीचे मालक अतुल चोरडिया, व्हीटीपी ग्रुपचे मालक संतोष जैन, ट्रायकॉन कंपनीचे ब्रिजेश सिंग तसेच गोळीबार करणारा संजूसिंग रामेश्वरसिंग व इतर कर्मचाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणात दोनवेळा तक्रार करूनही गुन्हा दाखल न करणाऱ्या लोणीकंद पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button