breaking-newsताज्या घडामोडीपुणे

महिलेने पोटच्या मुलाच्या अपहरणाचा रचला बनाव

पुणे – पतीकडून १५ लाख रुपये आणि फ्लॅट मिळविण्यासाठी महिलेने पोटच्या मुलाच्या अपहरणाचा बनाव रचल्याची घटना समोर आली आहे. मात्र हडपसर पोलिसांनी हा डाव उधळत महिलेसह तिला मदत करणाऱ्या मित्र – मैत्रिणीला अटक केली.

संगीता चांगदेव जगताप (वय ३८, रा. शेवाळवाडी), मैत्रिण संगीता गणेश बारड (वय २९, रा. लोणी काळभोर आणि मित्र अभिजीत अशोक कड (वय. ३३, रा. कोरेगाव मुळ. ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळवाडी येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळणाऱ्या ४ वर्षाच्या आर्यन नावाच्या मुलाचे एका पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आलेल्यांनी अपहरण केल्याची तक्रार त्याची आई संगिता जगताप हिने केली होती. त्यानंतर हडपसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखळ करून याप्रकरणी तपासाला सुरुवात केली. आरोपी संगीता जगताप हिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. दरम्यान तिचे काही दिवसांपुर्वी पहिल्या पतीसोबत असतानाच चांगदेव जगतापशी सुत जुळले. आणि त्यानंतर पतीने निधन झाल्यावर तिने जगतापशी लग्न केले. जगतापपासून तिला आर्यन नावाचा मुलगा झाला. चांगदेव जगताप हा शिर्डी येथे सिड फॉर्मचा व्यवसाय करतो. तो आई वडीलांसोबत तेथे राहतो. महिन्यातून कधीतरी तो पुण्यात येतो. दरम्यान त्याने काही दिवसांपुर्वी तेथे दुसऱ्या एका महिलेशी लग्न केल्याचे तिला समजले. त्यानंतर तिने त्याच्याकडे शिर्डी येथे जाऊन त्याचा जाब विचारला आणि त्याच्याकडे समझोता करण्यासाठी १५ लाख रुपये आणि एक फ्लॅटची मागणी केली. त्यानंतर जगतापने तिची मागणी फेटाळून लावली.

त्याने आणि त्याच्या आई वडीलांनी तिच्याकडे आर्यनचा ताबा मागितला. तिने त्यास नकार दिला. आणि मैत्रिण संगिता बारड आणि मित्र अभिजीत कड याच्याशी संपर्क साधून आर्यनच्या अपहरणाचा बनाव केला. त्यानंतर २८ एप्रिल रोजी प्लानप्रमाणे आर्यनचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर तिने याची माहिती पतीलाही दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केल्यावर अपहरण झालेल्या गाडीची माहिती मिळाली असे पोलिसांनी सांगितल्यावर तिने घाबरून जाऊन अभिजीत आणि संगीताला त्याला सोडून देण्यास सांगितले. मुलगा मिळाल्याची खात्री झाल्यावर दोघेही पसार झाले. परंतु पोलिसांनी तिघांनाही मोठ्या शिताफीने अटक केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button