breaking-newsपिंपरी / चिंचवडमहिला दिन

महिला दिन व वर्धापन दिनानिमित्त मनसेने जोपासली सामाजिक बांधिलकी

  • वायसीएममधील महिलांना फळं वाटून दिल्या शुभेच्छा
  • मनसेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लाभले योगदान

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त विविध सामाजिक संघटनांनी शहरात महिलांची दुचाकी तसेच पायी रॅली काढली. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबवून महिला दिन साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर मनसेच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्ण महिलांना फळे वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. जागतिक महिला दिनानिमित्त शहरात राबविण्यात आलेला मनसेचा हा उपक्रम अनोखा ठरला.

पिंपरी-चिंचवड मनसेचे शहराध्यक्ष तथा महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम घेण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त उच्च पदस्थ, उच्चशिक्षित, पदाधिकारी महिला अथवा सामाजिक योगदान देऊन यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या महिलांचा सामाजिक संघटनांच्या वतीने गौरव केला जातो. त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना सन्मानपूर्वक शुभेच्छा दिल्या जातात. मात्र, रुग्णालयातील खाटावर उपचार घेत असलेल्या रुग्ण महिलांकडे कोणी डुंकूनही पाहत नाही.

परंतु, पिंपरी-चिंचवड शहर मनसेच्या वतीने अशा महिलांची प्राधान्याने दखल घेण्यात आली आहे. जागतिक महिला दिन आणि मनसेचा वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली वायसीएम रुग्णालयातील रुग्ण महिलांना फळे वाटप करण्यात आली. तसेच, महिला दिनानिमित्त या महिलांना शुभेच्छाही देण्यात आल्या. मनसेचे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा या उपक्रमात मोठा सहभाग होता. या उपक्रमात मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, मनविसेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, मयूर चिंचवडे, परमेश्वर चिल्लरगे, अनिकेत प्रभू, तुकाराम शिंदे, निलेश पवार, जय सकट, रोहित काळभोर, निलेश नेटके, शिवनाथ दिलपाक आदींनी पुढाकार घेतला.

मुलगा असो किंवा मुलगी दोघांमध्ये भेदभाव करणंच मुळात चुकीचं आहे. आज मुलींना कमी समजण्याची गरज नाही. मुलांच्या बरोबरीने किंबहुना त्याहून अधिक पटीने मुली यशाच्या शिखरावर पोहोचत आहेत. त्याबद्दल तमाम महिला वर्गाचे कौतुक आहे. त्याबरोबरच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलांचा देखील सन्मान होणं तितकंच गरजेचं आहे. हे ओळखून आज मनसेने वायसीएम रुग्णालयातील सर्व महिलांचा सन्मान करून त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

सचिन चिखले, मनसे शहराध्यक्ष तथा गटनेता, पिंपरी-चिंचवड मनपा
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button