breaking-newsक्रिडा

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा : भारतीय महिलांचा उपांत्य फेरीत प्रवेश

गयाना – महिला टी-20 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीवीर फलंदाज मिताली राजच्या अर्धशतकी खेळी आणि फिरकी गोलंदाज राधा यादवच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयर्लंड महिला संघाचा 52 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय महिला संघानी उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने आयर्लंडसमोर विजयासाठी 146 धावांचे लक्ष्य देऊन मैदानात उतरलेल्या आयर्लंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर गेबी तेवीस 9 धावा काढून बाद झाली. त्यानंतर उत्तम लईत असलेल्या सी. सेलिंगटोनला मोठे फटके मारण्याचा मोह आवारला नाही. पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात ती यष्टीचीत झाली. त्यानंतर आलेल्या महिला फलंदाज धावगती वाढवण्यात अपयश आल्याने त्यांना पराभूत व्हावे लागले.

तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. मागील सामन्याप्रमाणेच या सामन्यातदेखील त्यांनी अर्धशतकी सलामी दिली. परंतु, धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात मानधना बाद झाली. तिने 29 धावा केल्या. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि मितालीची जोडी जमली. भारताला दुसरा झटका 107 धावांवर बसला. जेमिमा 18 धावा करून बाद झाली. त्यानंतर धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात कर्णधार हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती आणि डी. हेमलता झटपट बाद झाल्या. सलामीवीर मिताली राजने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि बाद झाली. शेवटी दिप्ती शर्माने 11 धावा करून भारताची धावसंख्या 145 पर्यंत नेली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button