breaking-newsक्रिडापुणे

महिलांच्या आंतरविद्यापीठ हॅंडबॉल स्पर्धा आजपासून

देशभरातील 49 विद्यापीठ होणार सहभागी 

पुणे– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांच्या पश्‍चीम विभागीय आंतरविद्यापीठ हॅंडबॉलस्पर्धेला आज पासून सुरुवात होणार असून. हि स्पर्धा मुकुंदनगर येथील चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात 29 ऑक्‍टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे.

महाराष्ट्रीय मंडळाचे सहकार्यवाह धनंजय दामले आणि प्रा. शिरीष मोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदे मध्ये या बाबत माहिती दिली आहे. या स्पर्धेत तब्बल 49 विद्यापीठांनी सहभाग नोंदवला असून त्यामध्ये 784 महिला खेळ्डूंचा सहभाग असणार आहे. त्याच बरोबर 100 हुन अधीक मार्गदर्शक आणि व्यवस्थापक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धा बाद आणि साखळीफेरी पद्धतीने खेळविण्यात येणार असून सकाळी 7 ते 1 आणि दुपारी 2 ते 6 अशा दोन सत्रांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

तसेच 31 ऑक्‍टोबर रोजी साखळी फेरी आणि 1 नोव्हेंबर रोजी बाद फेरीचे सामने रंगणार आहेत. सदर स्पर्धेत ग्वाल्हेर, बिकानेर, नागपूर, राजस्थान, गुजरात, उत्तर महाराष्ट्रामधिल विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेचे उद्घाटन आज आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार असून यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितिन करमाळकर, डॉ. दिपक माने आदी उपस्थीत रहाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button