breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध – शीतल कोतवाल

– घरेलू महिला कामगार काँग्रेसतर्फे दापोड़ित बैठकीचे आयोजन

पिंपरी | प्रतिनिधी

आगामी काळात महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. स्थानिक समस्यांचे निवारण करू. या पुढील काळात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश घरेलू महिला कामगार काँग्रेसच्या समन्वयक शीतल कोतवाल यांनी केले.

असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर संलग्न घरेलू महिला कामगार काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर व सुंदर कांबळे शहराध्यक्ष असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर तर्फे दापोडीतील आत्तार वीट भट्टी या भागांमध्ये वॉर्डनिहाय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी पक्षाची ध्येय धोरने ठरविण्यात आले. या वेळी कोतवाल बोलत होत्या.

या वेळी दापोड़ी प्रभाग अध्‍यक्षा शशिकला पोटफोडे यांनी हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच वार्डस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या धोंडाबाई भालेराव प्रमुख उपस्थित होत्या. विधवा महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजने बाबत महिलांना माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाला मालन गायकवाड, नीलम गवळी, शुभांगी शिंदे यांनी सहकार्य केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button