breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ, फडणवीसांची खोचक टीका

अमरावती – तीन पक्ष एकमेकाचे नॅचरल अलायन्स नाही. हे नैसर्गिक मित्र नसल्यानं असंच होत राहील. महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ आहे. या सरकारचा कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी खोचक टीका भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आमच्या नेत्याचा बॅनर फोटो का नाही ? असा जाब विचारत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर गोंधळ केला. यावर फडणवीस यांनी अमरावती येथील सभेत पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर टीकेची तोफ डागली.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. पण, स्थानिक पातळीवर तिन्ही पक्ष कुठे एकत्र येत आहे, तर कुठे धुसफूस पाहण्यास मिळत आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांच्यासमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे.

सोलापूर शहरात पदवीधर आणि शिक्षक आमदारकीच्या निवडणूक प्रचार सभेचं आयोजन करण्यात आले होते. उदय सामंत, बंटी पाटील, दत्तात्रय भरणे इत्यादी मंत्रीही हजर होते. महाविकास आघाडीची सभा असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या सभेला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पण, अचानक या सभेत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला.

सभेच्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या पोस्टरवर ‘महाविकास आघाडीची प्रचार सभा’ असं लिहिण्यात आले होते. पण, व्यासपीठावरील पोस्टरवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो पोस्टवर नव्हता. तसंच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा हा मतदारसंघ असून त्यांचाही फोटो नव्हता, त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच संतापले होते. त्यांनी व्यासपीठाकडे धाव घेऊन जोरात घोषणाबाजी केली. त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.

त्यावर टिकेची झोड उठवत फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केले. अमरावती येथील सभेत फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ आहे. या सरकारचा कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. तर तीन पक्ष एकमेकाचे नॅचरल अलायन्स नाही. हे नैसर्गिक मित्र नसल्यानं असंच होत राहील, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली.

राज्यात उद्या, सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय हा फार गांभीर्याने घेतला गेला पाहिजे. शिक्षकांची कोरोना चाचणी ही राज्य सरकारने आपल्या खर्चाने केली पाहिजे. सोशल डिस्टन पाळलं जात की नाही याचाही विचार केला पाहिजे. कारण पालक फार घाबरलेले आहेत. हा निर्णय सरसकट होऊ शकत नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button