breaking-newsमहाराष्ट्र

महाराष्ट्र बॅंकेकडून व्याजदराचे सुसूत्रीकरण

पुणे  – महाराष्ट्र बॅंकेने विविध कालावधीतील कर्जाच्या व्याजदरामध्ये (एमसीएलआर) सुसूत्रीकरण करण्याच्या उद्देशाने व्याजदर बदलले आहेत. नवीन व्याजदर 7 मे 2018 पासून प्रभावी होतील. 1 दिवसासाठी एमसीएलआर 8.30%, 1 महिन्यासाठी एमसीएलआर 8.35%, 3 महिन्यासाठी एमसीएलआर 8.45%, 6 महिन्यासाठी एमसीएलआर 8.55%, एक वर्षासाठी एमसीएलआर 8.75% असणार आहे.

बॅंकेने किरकोळ मुदत ठेवीवरील (1 कोटींपर्यंत) व्याजदर वाढविले आहेत. 1 ते 2 वर्षे कालावधीच्या किरकोळ मुदत ठेवीवर (1 कोटीपर्यंत) व्याजदर आता 6.50% झाला आहे तर 2 ते 3 वर्षे कालावधीच्या किरकोळ मुदत ठेवीवर (1 कोटीपर्यंत) व्याजदर आता 6.60% मिळेल जो आधी 6.25% होता. बेस रेट (आधार दर) मध्ये कोणताही बदल झाला नसून तो पूर्वीप्रमाणेच 9.50% (वार्षिक) इतका कायम ठेवण्यात आलेला आहे, असे बॅंकेने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button