breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर भटकंती करणार्‍या ‘चला मारु, फेरफटका’ या संस्थेला उपक्रमशील  पुरस्कार

चिंचवड | महाईन्यूज| प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले, गडप्रेमी नागरिक एकत्र येवून गेली सहा वर्षे महिन्याच्या ठराविक कालावधीत एकत्रित येवून बैठका घेतल्या जातात. तरुण पिढीला महाराष्ट्र राज्यातील गडकिल्ल्यांवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास येणार्‍या पिढीला माहित व्हावा, त्यांच्यासमवेत भटकंती करीत गडावरील कचरामुक्त, प्लस्टिकमुक्त, गडाची स्वच्छता करणे, त्या गडाचा इतिहास तरुण वर्गाला माहित करून देणे. जे गुणवंत विद्यार्थी आहेत, त्यांचा गुणगौरव करून त्यांना प्रोत्साहित करणे. आदी समाजाभिमूख कामे गेली सहा वर्षे ही संस्था राबवित आहे. याची दखल खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनने घेवून (दि.16) रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात त्यांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह देवून ‘चला मारु, फेरफटका’ या संस्थेला उपक्रमशील म्हणून गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार संस्थेचे एस.आर.शिंदे, श्रीकांत कदम, किरण कांबळे, कडूबाळ शिंदे, बाळासाहेब चव्हाण, राजेश देशमुख, दिपक नाईकवडी, योगेश चौधरी, हरिभाऊ दुधाळ, विश्वजीत पवार, नाना तिकोणे (सर), नीना खर्चे, पोर्णिमा देशमुख, अपर्णा कांबळे, संगीता माने, मिरा शिंदे, रुपाली काकडे आदी संस्थेतील सभासदांनी स्विकारला त्यांच्या या समाजाभिमुख कार्याचे उपस्थितींनी देखील कौतुक केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button