breaking-newsक्रिडा

महाराष्ट्राच्या राजवीर, रिगन यांची चमकदार कामगिरी

नवी दिल्ली – भारताचे युवा टेबल टेनिस खेळाडू राजवीर शाह आणि रिगन अलबुक्‍युरेक्‍यु यांनी इजिप्त ज्युनियर व कॅडेट ओपन स्पर्धेत सुवर्ण व दोन रौप्यपदकाची कमाई करताना आयटीटीएफ ज्युनियर सर्किटमध्ये आपली चमक दाखवली आहे.

13 वर्षीय राजवीरने मुलांच्या कॅडेट गटात आपली छाप पाडली.त्याला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चाल मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याची मोहीम उप-उपांत्यपूर्व फेरीपासून सुरू झाली.त्याने इजिप्तच्या मोहम्मद अब्देललतीफ आणि नंतर मोहम्मद एलसिसेला नमवित उपांत्यफेरी गाठली.राजवीरने स्वीडनच्या एलिअस जोर्गेनविरुद्ध चमकदार कामगिरी करत त्याला 3-0 असे नमविले. अंतिम सामन्यात राजवीरने स्थानिक खेळाडू बदर मोस्तफाला नमवित चमक दाखवली.

महाराष्ट्राचा आणखीन एक खेळाडू रिगन अलबुक्‍युरेक्‍युने देखील स्पर्धेत छाप पाडली.त्याने स्वीडनच्या ओस्कार डॅनियलसन सोबत खेळत मुलांच्या ज्युनियर सांघिक गटात रौप्यपदक मिळवले.या जोडीने उपांत्यफेरीत रशियाच्या अलेक्‍सादर क्रासकोवस्की व इजिप्तच्या मारवान नादेर आणि मोमेन अश्रफ यांना 3-2 असे नमविले. अंतिम सामन्यात त्यांना इजिप्तच्या मारवान अब्देलवहाब, अब्देलरहमान देनदान आणि युसूफ अब्देल -अझीझ या तिघांसमोर निभाव लागला नाही व 3-2 असे पराभूत व्हावे लागले. मुलांच्या ज्युनियर एकेरीत रिगनने अंदेरी राडू मिरोनला (रोमानिया)
उप उपांत्यपूर्व फेरीत, अब्देलरहमान देनदानला (इजिप्त) उपांत्यपूर्व फेरीत व मारवान अब्देलवहाब (इजिप्त) याला उपांत्यफेरीत 4-1 अशा समान फरकाने पराभूत केले.पण, चीनच्या शीक्‍सिआन डिंगने त्याला अंतिम सामन्यात नमविले.पण, त्याने भारताच्या खात्यात आणखीन दोन रौप्यपदकाची भर घातली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button