breaking-newsताज्या घडामोडीपुणे

महापाैर पदासाठी शितल शिंदे यांचा स्थायी सदस्य पदांचा राजीनामा

पिंपरी- भाजपाचे नगरसेवक शीतल शिंदे यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा उपमहापाैर शैलेजा मोरे यांच्याकडे  दिला आहे. त्यांचा राजीनामा उपमहापौरांनी मंजूर केला आहे. त्यामुळे महापाैर बदलाच्या हालचालीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे हे दाै-यावर आहेत.  त्यामुळे शितल शिंदे यांनी उपमहापौर शैलजा मोरे यांच्याकडे स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उपमहापौर मोरे यांनी त्यांचा राजीनामा त्वरित मंजूर करुन नगरसचिव कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्या जागेवर एप्रिलच्या महासभेत नवीन सदस्यांना संधी मिळणार आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राहुल जाधव, शितल शिंदे आणि विलास मडिगेरी यांच्यात स्पर्धा लागली होती.  परंतु, ऐनवेळी अचानक ममता गायकवाड यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या शितल शिंदे, राहूल जाधव यांनी स्थायी सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button