breaking-newsताज्या घडामोडीपुणे
महापालिकेसमोर नो पार्किंगमधील वाहनावर दंडात्मक कारवाई
पिंपरी- महापालिकेसमोरील पुणे-मुंबई महामार्गावर बेकायदेशीरपणे ‘नो पार्किंग’ मध्ये लावलेल्या फोर व्हीलर वाहनांवर पिंपरी वाहतूक पोलिसांनी शनिवारी धडक कारवाई केली. यावेळी वीस चारचाकी वाहनांना जॅमर लावून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर नो पार्किंग झोन आहे. त्या नो पार्किंगमध्ये अनेकजण चारचाकी वाहने लावली जातात. त्यामुळे सतत वर्दळीच्या असणा-या रस्त्यावर वाहने पार्क केल्यामुळे अन्य वाहन चालकांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्त्यांवर वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे ‘नो पार्किंग’मध्ये लावलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.