महापालिकेतील 71 अधिकारी कर्मचारी गुरुवारी होणार सेवानिवृत्त
पिंपरी – महापालिकेतील अनुभवी अधिकारी, कर्मचारी उद्या (गुरुवारी) निवृत्त होणार आहेत. त्यामध्ये पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता, उपमुख्यलेखापाल, लेखाधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, आरोग्य निरीक्षक, मुख्याध्यापक, लिपिक, वाहनचलाक अशा 71 जणांचा समावेश आहे.
पिंपरी महापालिकेत मनुष्यबळाचा अभाव आहे. एका-एका अधिका-यावर दोन-दोन तीन विभागाचा पदभार सोपविला आहे. त्यामुळे अधिका-यांवर कामाचा ताण येत आहे. त्यातच नियमित वयोमानानुसार अधिकारी, कर्मचारी निवृत्त होत आहेत. तर, काही अधिकारी, कर्मचा-यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. नियमित वयोमानानुसार बुधवारी पालिकेतील 71 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रविंद्र दुधेकर, उपमुख्यलेखापाल तानाजी जगदाळे, लेखाधिकारी मुकुंद कुलकर्णी, कार्यालयीन अधिक्षक बबन पोमण यांचा समावेश आहे.