breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेतील वर्ग एक-दोन पदाच्या आकृतीबंधाला मंजूरी, पण सेवा-नियमावली मिळणार कधी?

राज्याच्या नगरविकास विभागाचा अजब कारभार, भाजपचे आमदारही अपयशी

महापालिकेच्या नव्या आकृतीबंधानूसार सुमारे 11 हजार पदे राहणार

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकृतीबंधाला राज्य सरकारने 30 ऑगस्टला मंजुरी दिली. त्यात पालिकेच्या वर्ग एक आणि दोनमधील पदाना मान्यता दिली आहे. मात्र, त्या पदाची सेवा-नियमावली अद्यापही प्रतिक्षेत आहे. या आकृतीबंधानुसार वर्ग 1 – 44, वर्ग 2 – 51 पदे भरण्यात येणार आहे. त्यातही सामान्य प्रशासन, अभियांत्रिकी, अग्निशममन, वैद्यकिय, आरोग्य अशा एकूण 96 प्रवर्गात नवीन पदांना मंजुरी दिली असून पालिकेत तीन अतिरिक्त आयुक्त पदे राहणार आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील वाढती लोकसंख्या, नागरीकरणाचा झपाट्याने होणार विकास, विकास कामांची वाढती व्याप्ती विचारात घेता, नागरिकांना सोयी-सुविधा विषयक कामांत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यानूसार महापालिकेत विविध संवर्गातील पदांमधये वाढ करणे, नवीन पदे, संवर्ग निर्माण करणे, हा प्रस्ताव वेळोवेळी शासनाकडे सादर केला होता. महापालिका आयुक्तांनी विविध संवर्गात विभागनिहाय नव्याने पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता.

राज्य सरकारने 1 सप्टेंबर 2014 रोजी पिंपरी महापालिकेचा समावेश ब वर्गामध्ये केला. ब वर्गात समावेश झाल्यामुळे महापालिकेचा नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार केले आहेत. नियोजित आकृतीबंधात सेवांचे वर्गीकऱण प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, वैद्यकिय सेवा आणि अग्निशमन सेवा अशा संवर्गात करण्यात आले आहे. एकूण 11 हजार 571 ऐवढी पदे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, शासनाने तुर्तास फक्त वर्ग 1 व वर्ग 2 मधील आणि अत्यावश्यक सेवांची काही पदे भरण्यास मान्यता दिली.

त्यानुसार महापालिकेत नव्याने 771 नव्याने भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. महापालिकेच्या नव्याने प्रस्तावित केलेल्या मंजुर केलेल्या वर्ग एकच्या श्रेणीत सध्याची पदे 24 एवढी आहेत. तर नव्याने मंजुर करण्यात आलेली पदे 4 आहेत. आकृतीबंधातील एकूण पदे 64 आहेत. वर्ग दोनच्या श्रेणीत सध्याची पदे 132 एवढी आहेत. नव्याने मंजूर करण्यात आलेली पदे 51 आहेत. वर्ग तीन व चारच्या श्रेणीतील अत्यावश्‍यक विभागातील अग्निशमन विभागात सध्याची मंजुर पदे 126 एवढी आहेत. मंजुर करण्यात आलेली नवीन पदे 285 आहेत.

दरम्यान या सर्व जागा मंजूर झाल्या असल्या तरी एकूण जागेच्या 23 टक्के खुल्या प्रवर्गातील जागा असल्याने तेवढ्याच जागा सरळसेवा पद्धतीने महापालिकेला भरता येणार आहे. इतर आरक्षित जागा सद्यस्थितीत भरता येणार नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button