breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेतर्फे अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

पिंपरी –  महापालिकेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 293 व्या जयंतीनिमित्त मोरवाडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका आशा शेंडगे आदी उपस्थित होते. तसेच  शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

दरम्यान, महापालिकेतर्फे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी, मोरवाडी चौकातील अहिल्यादेवी पुतळ्यासमोर  शाहिर सुरेश सुर्यवंशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित पोवाडे सादर करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संदीप उबाळे, योगीता गोडबले व मानसी दातार यांचा ‘धनगरी ओव्या’ गीत संगीताचा कार्यक्रम देखील आयोजित केला  आहे. महिलांसाठी रांगोळी, मेहंदी, पाककला, तिखट पदार्थ व पाककला गोड पदार्थ, वेशभूषा अशा विविध  स्पर्धा घेण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button