breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या अभियांत्रिकी सेवा- नियमावलीत डिप्लोमाधारकांवर अन्याय

सहशहर अभियंता पदावरुन वगळले, कार्यकारी अभियंता पदावर 25 टक्के जागा मिळणार

विकास शिंदे

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकृतिबंधाला मंजूरी दिली. त्यानंतर नगरविकास विभागाने आता 18 फेब्रुवारीला महापालिका सेवा प्रवेश नियमाला मंजूर देण्यात आली आहे. मात्र, त्या सेवा प्रवेश नियमांमध्ये अभियांत्रिकी विभागात डिप्लोमाधारकांवर अन्याय केला असून त्यांना सहशहर अभियंता पदांतून वगळण्यात आले आहे. तर कार्यकारी अभियंता पदांवर 25 टक्के जागा ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील अन्य महापालिकेत डिग्री आणि डिप्लोमाधारक सेवाज्येष्ठता यादी एकच असताना पिंपरी-चिंचवड वेगळी केली? तो वाद कोर्टात सुरु असतानाच आता डिप्लोमाधारकांवर सेवा प्रवेश नियमांमध्ये अन्यायकारक वागणूक देण्यात आली आहे.

राज्य सरकारने 1 सप्टेंबर 2014 रोजी पिंपरी महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गामध्ये केला. ‘ब’ वर्गात समावेश झाल्यामुळे महापालिकेचा नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार केले आहेत. नियोजित आकृतिबंधात सेवांचे वर्गीकरण प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा आणि अग्निशमन सेवा अशा सहा संवर्गात करण्यात आले आहे.

महापालिकेतील एकूण 58 विभागासाठी 9 हजार 178  पदे सरकार मान्य असून 2 हजार 393 जागा नव्याने भरणे प्रस्तावित आहे. या भरतीमुळे महापालिका कर्मचारी संख्या 11 हजार 571 होईल. नव्या आकृतीबंधामुळे वेतन – भत्त्यावरील खर्च 42 टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. नगर विकास विभागाने महापालिकेच्या आकृतिबंधाला मंजूरी दिली आहे. तसेच नुकतीच महापालिकेचा सेवा प्रवेश नियम मंजूरी दिली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी देताना राज्याच्या नगरविकास विभागाने अभियांत्रिकी विभागात बदल केले आहेत. राज्यात महापालिकांमध्ये अभियांत्रिकी विभागाची डिग्री आणि डिप्लोमाधारकांची एकच सेवाज्येष्ठता यादी आहे. मात्र, पिंपरी महापालिकेत डिग्री व डिप्लोमाधारकांची वेगवेगळी सेवाज्येष्ठता तयार केलेली आहे. हा वाद अजूनही न्यायालयात सुरु आहे. तसेच महापालिकेत पदोन्नती देताना एकास-एक पदानुसार दिली जाते. परंतू, नवीन सेवा प्रवेश नियमावलीत सहशहर अभियंता पदावरुन डिप्लोमाधारकांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना सहशहर अभियंता पदावर नेमणूक देता येणार नाही. याशिवाय कार्यकारी अभियंता पदावर डिग्रीधारकांना 75 टक्के जागा तर डिप्लोमाधारकांना 25 टक्के जागानुसार पदोन्नती देण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या डिप्लोमाधारकांवर निश्चित यापुढील काळात अन्याय होणार आहे.

स्थापत्य सहायकांना पदोन्नती कशी?

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागात स्थापत्य सहायक ही पदे भरलेली आहेत. या पदावरील व्यक्तींना पदोन्नती देताना नियम पायदळी तुडविले जात आहेत. डिग्रीधारकांना तीन वर्ष आणि डिप्लोमाधारकांना 5 वर्ष अनुभव आवश्यक असताना अनुभव अट शिथील करुन त्यांना कनिष्ठ अभियंता पदावर पदोन्नती दिली जात आहे. तसेच काहींना उपअभियंता पदावर पदोन्नती दिली गेलेली आहे. त्यांना पदोन्नती देताना डीपीसी समितीने नियमांची पायमल्ली केल्याची चर्चा अभियांत्रिकी विभागात सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button