breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका शिक्षण समिती सभापती सोमवारी ठरणार, इच्छुकांमध्ये रस्सीखेच

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती पदासाठी सोमवारी (दि. 5) अर्ज भरणार आहेत. त्यानंतर सभापती पदाची निवडणुक होणार आहे. त्यामुळे सभापती पद मिळवण्यासाठी इच्छुक सदस्यांमध्ये रस्सीखेच लागली आहे.

पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपच्या चंदा लोखंडे, सागर गवळी, निर्मला गायकवाड, मनीषा पवार, शशिकांत कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वैशाली काळभोर, सुलक्षणा धर, भाऊसाहेब भोईर आणि शिवसेनेच्या रेखा दर्शले अशा नऊ सदस्यांची 25 जुलै रोजी झालेल्या महासभेत निवड करण्यात आली आहे. समितीत भाजपचे वर्चस्व असल्याने सभापती, उपसभापती भाजपचा होणार हे निश्‍चित आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शिक्षण समिती सभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

त्यानुसार येत्या सोमवारी (दि. 5) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. 9 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता महापालिकेतील महापौर मधुकरराव पवळे सभागृहात निवडणूक होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल कामकाज पाहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button