breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका वर्धापन दिनानिमित्त गुणवंताचा होणार गैारव

पालकमंत्री गिरीष बापट यांची प्रमुख उपस्थिती

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३६ व्या वर्धापनदिना निमित्ताने विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा तसेच औद्योगिक क्षेत्रातील गौरविलेल्या उद्योजकांचा, गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार गुरुवार (दि.११) पालकमंत्री गिरीष बापट यांचे हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाटयगृहात सायंकाळी 6 वाजता होणा-या कार्यक्रमास खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, यांची विशेष उपस्थिती तर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, ॲड. गौतम चाबुकस्वार, उपमहापौर सचिन चिंचवडे , सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विरोधी पक्षनेता दत्तात्रय साने, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

गुरुवार दि. ११ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ०९.३० वाजता मनपा मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर मनपा कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी व नगरसदस्य यांच्या विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये रस्सीखेच, संगीत खुर्ची, इ.स्पर्धा यांचा समावेश असणार आहे. यावेळी रक्तदान व नेत्रदान शिबीराचेही उद्घाटन होणार आहे. त्यानंतर महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मनपा भवनात होणार आहे.

तसेच दुपारी १२.०० वाजता अभिरुप महासभा होणार आहे. कै.अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी येथे दुपारी १२.०० वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ३.०० वाजता महापालिका कर्मचारी, अधिकारी व पदाधिका-यांचा गीत संगीत हा गीत गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.०० वाजता यशस्वी उद्योजक, गुणवंत कामगार व मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. मनपाच्या स्थापनेपासून आजी – माजी नगरसदस्य व नगरसदस्या तसेच नागरिकांनी व अधिकारी, कर्मचारी यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button