breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका कर्मचाऱ्यांसाठीची धन्वंतरी योजना कायम करा: आमदार अण्णा बनसोडे

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचा-यांसाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना कायम ठेवण्यात यावी. जोपर्यंत कोविड १९ परिस्थिती अटोक्यात येत नाही, तोपर्यंत विमा पॉलिसीबाबत विचार करण्यात येऊ नये, धन्वंतरी योजना मंगळवार (दि.१५.०९.२०२०) पासून स्थगित करणेबाबतचा आदेश रद्द करावा, अशा सूचना राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे काही दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे केल्या होत्या. त्याबाबत पुन्हा एकदा स्मरणपत्र आमदार बनसोडे यांनी आयुक्तांना पाठविले आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मंगळवार दि.१५.०९.२०२० मनपा कर्मचाऱ्यांसाठी विमा एजंट कंपनी मार्फत विमा पॉलिसी सुरु करण्याबाबत खरेदी करण्यात येत असल्याचे समजते. परंतू, मनपा कामगार महासंघाचा विरोध असून सध्याची धन्वंतरी योजना सुरु ठेवावी, अशी आग्रही मागणी महासंघाने केलेली आहे. त्या अनुषंगाने कोविड १९ साथ नियंत्रणात येईपर्यंत विमा पॉलिसी खरेदी करण्यात येऊ नये व धनवंती योजना कायम ठेवण्यात यावी.

याबाबत मी संदर्भीय पत्राद्वारे आपणाकडे विनंती केली होती की, कोविड १९ साथ नियंत्रणात येईपर्यंत विमा पॉलिसी खरेदी करण्यात येऊ नये व धन्वंतरी योजना कायम ठेवण्यात यावी. तसेच ज्या घटकासाठी ही योजना आहे त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनपा कर्मचारी महासंघासही विश्वासात घ्यावे तसेच मनपा निर्णयास कर्मचारी महासंघाची मान्यता असावी असा उल्लेख केला होता. विमा एजंट कंपनीच्या फायद्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून विमा पॉलिसी रक्कम व धन्वंतरी योजनेतून होणारा खर्च यात मोठी तफावत असल्याने मनपाचे नुकसान होताना दिसत आहे. तसेच विमा कंपनी अनेक विकार / आजार स्विकारत नसल्याने कर्मचारी वर्गास या पॉलिसीचा संपूर्ण लाभ होणार नसल्याचे कामगार संघाचे मत आहे.

मनपा कर्मचारी कोविड काळात मोठ्या जिद्दीने जबाबदारी पार पाडत असताना त्यांचे मनोबल खच्चीकरण होईल, असे निर्णय घेणे उचित वाटत नाही. कामगारांना योग्य व शाश्वत आरोग्य खर्च प्रतिपूर्ती योजना मनपाने राबविणे अपेक्षित आहे. कोविड प्रादुर्भावाच्या काळात धन्वंतरी योजना सुरु ठेवावी व धन्वंतरी योजना १५.०९.२०२० पासून स्थगित करणेबाबतचा आदेश रद्द करून पालिका कर्मचाऱ्याच्या बाजूने आश्वासक निर्णय घ्यावा, असे या निवेदनात आमदार बनसोडे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button