breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका कर्मचारी महासंघात परिवर्तन ‘अंबर चिंचवडे यांच्या आपला महासंघ’ पॅनल विजय

पिंपरी महाईन्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी पदाधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या निवडणुकीत अंबर चिंचवडे गटाचे “आपला कर्मचारी महासंघा”चे सर्व म्हणजे 21 उमेदवार विजयी झाले असून स्व.शंकर गावडे कर्मचारी महासंघाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामध्ये पॅनल प्रमुख बबन झिंझुर्डे हे पराभूत झाले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघासाठी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यात अंबर चिंचवडे यांना यश आले आहे. चिंचवडे यांच्या आपला महासंघ पॅनलने चुरशीच्या लढतीत बाजी मारत महासंघावर कब्जा केला.

न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी झालेल्या मतदानाचे निकाल आताच हाती आले असून महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागल्याने झिंजुर्डे यांचे महासंघावरील गेल्या 15 वर्षातील वर्चस्व आज संपुष्ठात आले. महापालिका कर्मचाऱयांनी आज परिवर्तन घडवून आणले तर या विजयाचे अंबर चिंचवडे हे शिल्पकार ठरले आहेत.

महापालिकेच्या एकूण 6989 मतदानापैकी 5533 कामगारांनी मतदान केले. सकाळी 7 ते सांयकाळी 4 पर्यंत उत्स्फूर्त झालेल्या मतदानात 81.41 टक्के मतदान झाले.

सुरुवाती पासूनच प्रचंड उत्सुकता असलेली ही निवडणूक अटीतटीची झाली शिवाय या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे यावर्षी निवडणुकीत पडद्याआडून राजकीय पुढारी व पालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतल्याचे दिसून आला,तर पालिकेचे शिक्षक यांचा मोठा सहभाग दिसला.

“आपला” कर्मचारी महासंघाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.
1)अंबर चिंचवडे
2)अभिमान भोसले
3)सुप्रिया सुरगुडे
4)योगेश रसाळ
5)बाळासाहेब कापसे
6)अविनाश ढमाले
7)धनाजी नखाते
8)गोरख भालेकर
9)शुभांगी चव्हाण
10)विलास नखाते
11)अमित जाधव
12) सुरेश गोरगोटे
13)बाळू साठे
14)अनिल राऊत
15)धनेस्वर थोरवे
16)अविनाश तिकोणे
17)रंजीत भोसले
18)सुभाष लांडे
19)मिलिंद काटे
20)नवनाथ शिंदे
21)योगेश वंजारे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button