breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकरांची २५ किमी सायकल सवारी

रिर्व्हर सायक्लोथॉनमध्ये सहभागी सायकलपटूंना प्रेरणा

नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

पिंपरी । प्रतिनिधी

‘फिट पीसीएमसी’ असा संदेश देणारे महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी ‘रिर्व्हर सायक्लोथॉन-२०२१’ मध्ये २५ किमी सायकल चालवून शहरवासीयांना नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाची साद घातली. यामुळे शहरातील नवोदित सायकलपटूंना प्रेरणाही मिळाली आहे.

शिवपूत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, सायकल मित्र, अविरत श्रमदान आणि महेशदादा स्पोर्टस फाउंडेशन यांच्या वतीने ‘रिर्व्हर सायक्लोथॉन-२०२१’ चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार महेश लांडगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, स्थानिक नगरसेवक-नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते.

‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ अंतर्गत १० किमी  व २५ किमी अशी रॅली घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली. अस्मी लोंढे यांनी गणेश वंदना करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर राज्याभिषेक दिनानिमित्त शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. सायकलिस्ट सहभागी झाले व प्रत्येक सायकलस्वारास टी शर्ट , मेडल, अल्पोपहार देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष घुले व संतोष गाढवे यांनी केले. तसेच, आभार सचिन लांडगे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button