breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महानगरपालिका शहर अभियंतापदाचा राजन पाटील यांना पदभार देवू नये

  • विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरासाठी महत्वकांक्षी असलेल्या पाणी पुरवठा टप्पा 3 मधील कामात दिरंगाई केल्याने कामास विलंब झाला. त्यामुळे एस.जे.कुलकर्णी यांच्या चाैकशी समितीने त्यांना दोषी ठरविले होते. त्यामुळे शहर अभियंतापदाचा राजन पाटील यांना पदभार देण्यात येवू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महानगरपालिकेचे सहशहर अभियंता राजन पाटील यांनी पाणी पुरवठा टप्पा 3 च्या कामात दिरंगाई केली होती. या कामास विलंब झाल्याने एस.जे. कुलकर्णी याच्या चाैकशी समितीने त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. त्याची खातेनिहाय चाैकशीही करण्यात आली.

त्यांनी पाणी पुरवठा कामास विलंब लावल्यामुळे महापालिकेला सुमारे 19 लाख 73 हजारांचा विनाकारण भूर्दंड सोसावा लागला होता. हा भूर्दंड राजन पाटील यांच्याकडून वसूल करावा, त्यांना पदावतन करण्यात यावे, अशी शिफारस केलेली होती. घरकूल योजनेत वाढीव दर देवून राजन पाटील यांनी ठेकेदारांचा फायदा केला होता. तसेच भक्ती-शक्ती उड्डाणपूलाच्या कामामध्ये देखील ठेकेदाराला सुमारे 20 कोटी रुपये वाढीव दिल्याचा आरोप आहे.

त्यामुळे राजन पाटील यांना शहर अभियंता अशा महत्वाचे पद देण्यात येवू नये, तसेच राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अ.मा.भालकर यांची प्रतिनियुक्तीने महापालिकेत रूजू करुन घेतले आहे. अद्याप त्यांना पदभार देण्यात आलेला नाही. त्यामुळे शहर अभियंतापदी अ.मा. भालकर यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी साने यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button