breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

मल्ल्याविरोधातील लंडन खटल्यात बँकांचा विजय; १० हजार कोटींची संपत्ती जप्त

लंडन : भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेऊन पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला इंग्लंडमध्ये मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडमधील न्यायालयात भारतीय बँकांनी मल्ल्याविरोधात दाखल केलेला दीड अब्ज डॉलर्सच्या खटल्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला आहे. यामुळे मल्ल्याची जगभरातील संपत्ती गोठवण्याचा आदेश न्यायालयाने कायम ठेवत त्याच्याकडून दीड अब्ज डॉलर्सची (१० हजार कोटी) वसुली करण्यास बँकांना परवानगी दिली आहे.

ब्रिटनच्या न्यायालयात १३ भारतीय बँकांनी मल्ल्याविरोधात फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा खटला दाखल केला होता. यावरील सुनावणीवेळी न्यायाधीश अँड्रयू हेनशॉ यांनी विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मागे घेण्यास नकार दिला. शिवाय मल्ल्याकडून १० हजार कोटींची वसुली करण्यास बँकांना परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे इंग्लंड किंवा वेल्समधील कोणत्याही संपत्तीची विक्री किंवा हस्तांतरित मल्ल्याला करता येणार नाही. विशेष म्हणजे या निर्णयावर अपील करण्याची परवानगीही न्यायालयाने मल्ल्याला दिलेली नाही. या निर्णयानंतर मल्ल्याच्या वकिलांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button