breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मला माफ करा… मी हरलो… : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. करोनाची लागण झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. आव्हाड यांच्या संपर्कातील व्यक्तीला करोना झाल्याने आव्हाड यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबाची करोना चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये आव्हाड यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबाला करोना झालेला नसल्याचे सिद्ध झालं. असं असलं तरी आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे. त्यानंतर आव्हाड यांनी फेसबुकवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. माफ करा.. मी हरलो… असं आव्हाड म्हणाले.

कोव्हिड १९ चा गोंधळ हा साधारणत: ८-१० मार्चनंतर सुरु झाला. मी तेव्हाही माझ्या खात्याच्या बैठकांमधून गोरगरीब जनतेचे एस.आर.ए. चे प्रश्न सोडविण्यात मग्न होतो. माझे कर्मचारी तेव्हाही मला सांगायचे स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. नका पुढे जाऊ. पण, गोर गरीबांसाठी काम केल पाहिजे ही शरद पवारांची असलेली शिकवण आणि थोडासा माझ्यातला अतिशहाणपणा यामुळे मी काम करतच राहीलो. लॉकडाउन पर्यंत मी काम करतच होतो. लॉकडाउन नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की सगळ्या व्यवस्था कोलमडल्या. लोकांना बाहेर पडणे कठीण झाले. मग आता या लढाईत काय करायचं, असं आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

करमुसेचाही उल्लेख
“अधे-मधे अनंत करमुसेचे प्रकरण झाले. करमुसेने केल ते एकदम बरोबर केलं. माझे अर्धनग्न चित्र फेसबुकवर टाकलं. २०१७ सालच्या पोस्टमध्ये तो शरदचंद्रजी पवार साहेबांना शरदुद्दीन म्हणतोय. एकदम चांगल काम करत होता. सगळ्यांच्या समोर व्हिलन जितेंद्र आव्हाड. मला समजत नाही की सगळ्यांना मी एवढा का खुपतो. त्याने माझे अर्धनग्न चित्र टाकलय ते चुकीच आहे असं म्हणायची हिम्मत कुणीच दाखवली नाही. किंवा त्यानंतर माझ्या पत्नीवर आणि मुलीवर बलात्कार करण्याच्या ज्यांनी धमक्या दिल्या त्याबद्दल कुणीच अवाक्षरही काढले नाही. ना त्यांना कोणी अटक केली, ना त्यांच्यावरती कारवाया झाल्या. आजही करमुसे हा त्याचे फेसबुक अकाऊंट पोलीसांना उघडूच देत नाहीये. असो.., तो पोलीसी तपासाचा भाग आहे आणि याबाबत मला काही बोलायचे देखील नाही. पण, आज जेव्हा सगळी माध्यमं बोट जितेंद्र आव्हाडकडे दाखवत आहेत. तेव्हा मात्र माझ मन हरल्यासारख झाल आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button