breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘मला पुन्हा एकदा तुमचा आर्शिवाद हवाय’ माजी आमदार आण्णा बनसोडेची पिंपरीकरांना भावनिक साद

पिंपरी |महाईन्यूज|विकास शिंदे

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार आण्णा बनसोडे यांनी पिंपरीकरांना भावनिक साद घातली आहे. ‘मला पुन्हा एकदा तुमचा आर्शिवाद हवाय’ असे सांगत त्यानी मतदारांना आपलंस करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी मतदारांच्या गाठी-भेटी, काॅर्नर बैठका घेत, विविध मंडळातील तरुणांचा मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता, त्यांनी मतदारांची मने जिंकली आहेत. दरम्यान, पिंपरी विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष की राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या तिकीट लढवणार, याबाबत निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून पिंपरी बहूरंगी सामना रंगणार आहे. अनेक आजी-माजी नगरसेवक मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याने लढती लक्षवेधी ठरणार आहे. पिंपरी मतदारसंघ छोटा आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी असा १२ किलोमीटरच्या क्षेत्रात हा मतदारसंघ आहे. अर्धशतकाहून अधिक झोपडपट्ट्या आहेत. स्थानिक गावकऱ्यांबरोबरचर मुस्लिम-दलित बहुल आणि झोपडपट्टी असे मतदारांचे संमिश्र प्रमाण आहे.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार आण्णा बनसोडे यांना पिंपरीकरांनी विजयी केले होते. मात्र, 2014 च्या निवडणूकीत शिवसेनेकडून पराभव स्विकारा लागला. त्यामुळे माजी आमदार आण्णा बनसोडे यांनी जोरदार तयारी केली आहे. मतदारांच्या घरोघरी जावून गाठी-भेटी, कार्यकर्त्यांच्या काॅर्नर बैठका घेवून गतविधानसभा निवडणुकीत झालेला दगाफटका यावेळेस बसू नये, याकरिता नियोजनबध्द प्रचार सुरु आहे.

संध्या पिंपरी विधानसभा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीने जय्यत तयारी सुरू केली आहे. महापालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार आण्णा बनसोडे यांनी पिंपरी शहराचा मोठ्या प्रमाणात विकास केला. सर्वाधिक रस्ते विकासाची कामे केली. रस्त्यांच्या प्रशस्त जाळ्यामुळे पिंपरीतील वाहतुकीचे प्रश्न सुटण्यास मदत झाली. मतदारसंघातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात मदत केली.

त्यामुळे जे बोलतो ते करुन दाखवलं. तुमच्या माझ्या स्वप्नातली पिंपरी साकारण्यासाठी अजून खुप काही करायचं. त्याकरिता मला पुन्हा एकदा आर्शिवाद पाहिजे, असं भावनिक साद बनसोडे यांनी पिंपरीकरांना घातली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button