breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला रिक्षासह कष्टकरी कामगार संघटनेचा पाठिंबा – बाबा कांबळे 

पिंपरी – मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला असून या बंदमध्ये रिक्षा चालक, टपरी, पथारी, हातगाडी धारक आणि कष्टकरी जनता सहभागी होणार असल्याची माहिती कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली.

 

बंदला पाठिंबा देत असल्याचे पत्र संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यू पवार यांना देण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठ सकल मराठा समाजाच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात आला आहे. याबरोबरच धनगर समाज आणि मुस्लिम समाज यांना आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन सुरु आहे. मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाच्या मागण्या सरकारने त्वरित मंजूर करून त्यांना कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्यावे. अशी मागणी देखील बाबा कांबळे यांनी केली आहे.

 

हा फक्त मराठा, धनगर मुस्लिम समाजाचा प्रश्न नसून महाराष्ट्रात सामाजिक समता  प्रस्थापित व्हावी, आणि शांततेच्या मार्गाने सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे बाबा कांबळे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button