Uncategorizedताज्या घडामोडीपुणे

मनसेचे नेते बाळा नांदगावकर उद्या पिंपरी-चिंचवड दाै-यावर

पिंपरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर हे बुधवारी पिंपरी-चिंचवड दाै-यावर येत आहेत. शहरातील पक्षाच्या पदाधिका-यांची भेट घेवून पक्ष संघटना वाढीबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती मनसेचे शहराध्यक्ष तथा महापालिकेचे गटनेते सचिन चिखले यांनी दिली. 

मोरवाडी येथे होणा-या बैठकीला अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, जिल्हाध्यक्ष समीर ठिगळे, रविंद्र गारुडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  पिंपरी-चिंचवड शहरात मनसेची पक्ष बांधणीवर चर्चा करणार आहेत. महापालिकेतील पक्षाचे संख्याबळ देखील घटले आहे. 2012 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत मनसेचे चार नगरसेवक निवडून आले होते. परंतु, 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत मनसेचे एकमेव उमेदवार निवडून आला आहे. शहरातील पक्षाची ताकद कमी झाली आहे. पक्ष संघटना पुन्हा बळकट करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button