breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मनसेचा मोर्चा; भाजप आमदारांकडून वाहनाची सोय?

भाजपाचंही पाठबळ मनसेला मिळालं आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु

पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तान, बांग्लादेशी घुसखोरांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मनसेचा मोर्चा चर्चेत आला आहे. राज ठाकरेंनी सीएए कायद्याला थेट पाठिंबा दिला नसला तरी कुठेतरी मनसेची भूमिका भाजपाच्या सोयीचं आहे. मनसेकडून गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान महामोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहे.

पुण्यातून मोर्चासाठी निघणाऱ्या बसवर भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगे यांचे नाव असल्याने या मोर्चासाठी भाजपाचंही पाठबळ मनसेला मिळालं आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. डेक्कन भागातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत मोर्चासाठी येणार आहे. मात्र या कार्यकर्त्यांसाठी ठेवण्यात आलेल्या गाडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. महेश लांडगे यांच्या पाहुण्यांची ही गाडी आहे असं सांगण्यात येत आहे. तर मनसेच्या या मोर्चासाठी पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनाही सहभागी होणार असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button