breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनपा ठेकेदाराचा उद्दमपणा, भूमिगत केबल तोडली, आता महावितरणची पोलिसांत तक्रार

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ठेकेदाराने खोदकाम करताना वाकड परिसरातील महावितरणची भूमिगत केबल दुस-यांदा तोडली आहे. याबाबत एकदा तक्रार केलेली असताना पुन्हा दुस-यांदा केबल तोडण्याचा उद्दमपणा या ठेकेदाराने दाखविला आहे. याप्रकरणी महावितरण व्यवस्थापनाने वाकड पोलीस ठाण्यात संबंधित ठेकेदाराच्या विरोधात तक्रार दिली आहे.

महावितरणच्या ताथवडे शाखेचे सहाय्यक अभियंता प्रकाश नाईकवाडे यांनी याबाबत वाकड पोलिसांना तक्रार अर्ज दिला आहे. त्यात म्हटले आहे की, बजरंगबली कन्स्ट्रक्‍शनमार्फत वाकड परिसरात ड्रेनेज लाईनचे काम सुरु आहे. भूमिगत काम करताना कंपनीकडून महावितरणला कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. महावितरणच्या उच्चदाब व लघुदाब असणाऱ्या वाहिन्या भूमिगत टाकण्यात आल्या आहेत. भूमिगत कामे करताना याबाबतची माहिती महावितरणला देणे आवश्‍यक आहे. अशी मागणी महावितरण व्यवस्थापनाने केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button