breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनपाच्या टीपी स्किमला शेतक-यांच्या विरोधानंतर महापौरांनीही दर्शविला विरोध

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमधील बो-हाडेवाडी, जाधववाडी, चिखली गावांच्या नगर रचना योजनेस (TP Scheme) महापौरांनी विरोध दर्शविला आहे.

विकास योजना प्रस्तांवाची अंमलबजावणी करणे हा नगररचना योजना तयार करण्याचा मुख्य उद्देश असतो. प्रभाग क्र. २ बो-हाडेवाडी, जाधववाडी, चिखली या गावातील सर्व नागरिक, शेतक-यांच्या शिष्टमंडळाने महापौर राहुल जाधव यांची समक्ष भेट घेऊन प्रस्तावित नगर रचना योजनेस (TP Scheme) तीव्र विरोध दर्शविला.

बो-हाडेवाडी, जाधववाडी, चिखली भागातील सर्व गट क्रमांकामधील शेतक-यांचा नगर रचना योजना (TP Scheme) राबविण्यास असलेला विरोध लक्षात घेऊन सदर भाग हा TP Scheme मधून वगळण्यात यावा व स्थानिक शेतक-यांना विश्वासात घेऊनच नगररचना योजना (TP Scheme) राबविण्याच्या सूचना महापौर राहूल जाधव यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button