breaking-newsराष्ट्रिय

मध्य प्रदेश बनावट मतदार यादी चौकशीचे निवडणूक आयोगाचे आदेश

नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील बनावट मतदार यादीबाबत कॉंग्रेसने केलेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्यात यावी असा आदेश निवडंणूक आयोगाने दिला आहे आणि त्यासाठी दोन चौकशी समित्या भोपाळला रवाना करण्याचा निर्णय घेतला आहे. या समित्यांनी आपला अहवाल 7 जून पर्यंत निवडणूक आयोगाला द्यायचा आहे.

मध्य प्रदेशातील मतदार याद्यांमध्ये सुमारे 60 लाख बनावट मतदारांची नावे सामील केली असल्याचा आरोप कॉंग्रेसने रविवारी केला होता. त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने चौकशीचा आदेश दिला आहे आणि राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली आहे.

दोन्ही चौकशी समित्यांनी रोजच्या रोज आपला अहवाल निवडणूक आयोगाला सादर करायचा आहे. सध्या चार विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांची चौकशीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. एक चौकशी समिती नरेला आणि भोजपूर मतदार संघातील मतदार याद्यांची आणि दुसरी चौकशी समिती होशंगाबाद आणि सिवनी-मालवा मतदार संघांतील मतदार याद्यांची चौकशी करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button