breaking-newsराष्ट्रिय

मध्य प्रदेशात विटांनी भरलेला ट्रक उलटून 4 मजूर ठार

सिंगरौली (मध्य प्रदेश) – मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्युमुळे चार मजूर मरण पावल्याची माहिती देण्यात आली आहे. विटांखाली चिरडले जाऊन हे मजूर जागेवरच मरण पावले. विटांच्या ढिगाखाली आणखी काही मजूर दबले गेले असण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सिंगरौलीच्या जियावना पोलीस ठाणा विभागात करथुआ गावाजवळ विटांनी भरलेला एक ट्रक पलटी झाला. ट्रकमधील विटांवर बसलेले मजूर विटांखाली दबले जाऊन मरण पावले. आणखी काही मजूर विटांच्या ढिगाखाली दबले गेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button