breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मंदिर बंद, उघडले बार ; उद्धवा… धुंद तुझे सरकार ! चिंचवड विधानसभेत भाजपचा ‘हल्लाबोल’

पिंपरी | महाईन्यूज

संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू आणि मंदिर बंद असे काळे चित्र उभे केले आहे. या निंदणीय निर्णयाविरोधात आणि जनतेची श्रद्धास्थाने असलेली मंदिरं ताबडतोब उघडावीत, या मागणीकरिता श्री मोरया गोसावी महाराज समाधी मंदीर परिसरात भारतीय जनता पार्टी चिंचवड-किवळे मंडलाच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, भागवताचार्य गवळी महाराज व शहर सरचिटणीस नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, मोरया व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष खंडाईत, चिंचवडगावातील हनुमान भजनी मंडळ या संस्थांनी या लाक्षणिक उपोषणास पाठिंबा दिला. तसेच, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस विजय फुगे, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेवक राजेंद्र गावडे, कैलास बारणे, नगरसेविका करुणा चिंचवडे, ब प्रभाग स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, महीला मोर्चा अध्यक्ष उज्वला गावडे यांच्यासह विजय सिनकर, काळूराम बारणे, शेखर चिंचवडे, धनंजय जगताप, प्रशांत आगज्ञान, सनी बारणे, रविंद्र प्रभुणे, प्रदिप सायकर, मिथुन बोरगांव, स्वप्निल देव, अनिकेत पायगुडे, केदार बावळे, वरद देव, सुप्रिया पाटील, दिपाली धनोकार, शहर भाजपा महिला मोर्चा चिंचवड विधानसभा अध्यक्ष तथा सरचिटणीस कुंदाताई भिसे, रंजना चिंचवडे, पल्लवी वाल्हेकर, मनीषा चिंचवडे, शोभा भराडे, राधिका बोर्लीकर, हनुमान भजनी मंडळांचे बेलसरे गुरुजी, घुले महाराज यांच्यासह पक्षाचे मंडल पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक या उपोषणात सहभागी झाले होते.

हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी मंडलाचे अध्यक्ष व संयोजक योगेश चिंचवडे, सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय शाळिग्राम, भाजयुमोचे अजित कुलथे, महेश मिरजकर, प्रदीप पटेल, तेजस खेडकर यांनी परिश्रम घेतले.

सरकारने मंदिरे उघडावी या मागणीसाठी आज राज्यभरात भाजपकडून आंदोलन केले जात आहे. सरकारने बियर बार आणि अवैध धंदे सुरू केले. मात्र, मंदिरे उघडली नाहीत. मंदिरे लोकांना अध्यात्मिक शक्ती देतात. मात्र सरकारने फक्त स्वतःचे घर चालवण्यासाठी बार आणि अवैध धंदे सुरू केले आहेत.

कुंदा भिसे, अध्यक्ष/सरचिटणीस, महिला मोर्चा, चिंचवड विधानसभा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button