breaking-newsपुणे

मंदिरातील घंटा, समई चोरणारे आरोपी अटक

पुणे- दत्तवाडी पोलिसांनी घरफोडीतील आरोपीला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून सिंहगड रस्त्यावरील दत्तमंदिर रेणुकामाता मंदिर येथील चोरलेली पितळीची घंडा व समई हस्तगत करण्यात आली. कृष्णा ज्ञानोबा मोरताटे (20,रा.चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) असे अटक आरोपीचे नाव आहे.

दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विकास कदम, सागर सुतकर यांना आरोपी चोरीची समई व घंटा विकायला येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राजाराम पुल येथे सापळा रचण्यात आला. तेथे व्यंकीज हाऊसच्या पुढे आरोपीला एका गोणसह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या गोणीमध्ये पितळेची घंटा व समई मिळून आली. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने ही समई व घंटा मित्र सागर जाधव, महादेव उर्फ दादा शिंदे यांच्या सहकार्याने दोन महिन्यापूर्वी सिंहगड रस्ता येथील शारदा मठासमोरील मंदिरातून चोरल्याचे कबूल केले. त्याला न्यायालयात हजर केले असता 31 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याचा साथीदार सागर जाधव याला दोन दिवसांपूर्वी दत्तवाडी पोलिसांनी अटक केली असून तो पोलीस कोठडीत आहे. तर दुसरा साथीदार महादेव शिंदे हा बारामती येथे असल्याची माहिती मिळाली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डफळ, पोलीस कर्मचारी तानाजी निकम, रविंद्र फुलपगारे, सधीर घोटकुले, महेश गाढवे, विकास कदम, सागर सुतकर, रोहन खैरे, राहुल ओलेकर, शरद राऊत, शिवाजी क्षिरसागर, अमित बोडरे, अभिजित कळसकर यांनी केली आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button