breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मंत्र्याला मिळाला कोणता बंगला?, बघा यादी, अजित पवारांना पुन्हा ‘देवगिरी’

मुंबई |महाईन्यूज|

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी, (दि.३०) झाला. यावेळी एकूण ३६ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असला तरी अद्याप खातेवाटप जाहीर झालेले नाही. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय बंगल्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देवगिरी बंगला देण्यात आला आहे. गेल्या आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे हाच बंगला होता. त्यांना पुन्हा एकदा तोच बंगला मिळाला आहे.

कोणत्या मंत्र्याला मिळाला कोणता बंगला?
अशोक चव्हाण – मेघदूत
दिलीप वळसे-पाटील – शिवगिरी
अनिल देशमुख – ज्ञानेश्वरी
डॉ. राजेंद्र शिंगणे – सातपुडा
राजेश टोपे – जेतवन
नवाब मलिक – अ-५
हसन मुश्रिफ – ब-५
वर्षा गायकवाड – ब-४
डॉ. जितेंद्र आव्हाड – ब-१
सुनील केदार – ब-७
विजय वडेट्टीवार – अ-३
अमित देशमुख – अ-४
उदय सामंत – ब-२
दादा भुसे – ब-३
संजय राठोड – क-१
गुलाबराव पाटील – क-८
के सी पाडवी – क-३
संदिपान भुमरे – क-४
बाळासाहेब पाटील – क-६
अनिल परब – क-५
अस्लम शेख – क-२
यशोमती ठाकूर – ब-६
शंकरराव गडाख – सुरुची-१६
धनंजय मुंडे – अ-९
आदित्य ठाकरे – अ-६

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button