breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरावर धडकली युवक कॉंग्रेस

शेतकरी चळवळीच्या समर्थनार्थ युवक कॉंग्रेसचे आंदोलन  

पुणे | प्रतिनिधी

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटना गेल्या 15 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. शेतक -यांकडून होत असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना पुणे शहर युवा कॉंग्रेसच्या वतीने माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलन केले. या वेळी युवा कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शेतकरी कायदा रद्द करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी केले. युवा शहर अध्यक्ष विशाल मालके, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष सौरभ अमराळे आदीसह सुमित नवले, इंद्रजित साळुंखे, निखिल कविश्वर, प्रताप काळे, हृषिकेश साठे, अभिजित रोकडे, कुणाल काळे, प्रताप शिलीमकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळी ११. 3० च्या सुमारास पुणे युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर जमले. तेथे बसून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सोमवारी पुण्यात पावसाने हजेरी लावली. पावसातच कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. तब्बल एक तासानंतर कोथरूड पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button