breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मंत्रालयासमोर शेतक-याकडून मोफत दुध वाटप आंदोलन

मुंबई – राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार गाईच्या दुधाला प्रतिलिटर सत्तावीस रुपये भाव द्यावा, दूध पावडरच्या निर्यातीसाठी अनुदान द्यावे, शालेय पोषण आहारात दुधाचा समावेश करावा, या मागण्यांसाठी बुधवारी (९ मे) मंत्रालयासमोर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मोफत दूधवाटप आंदोलन करण्यात येणार आहे.

दुधाला भाव वाढवून देण्यासाठी ३ मेपासून संपूर्ण राज्यात मोफत दूधवाटपाचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत दुधाला मिळणारा भाव सतरा ते अठरा रुपये प्रतिलिटर असा असून हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे ९ मे रोजी मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, दूध दरावरून शनिवारी नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासे फाटा येथे ‘सर्व प्रहार जनशक्ती संघटने’च्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button