breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मंत्रालयाच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिका उभारणार नऊ मजली प्रशासकीय इमारत

सुमारे दोनशे कोटी खर्च, लवकरच सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव ठेवणार

पिंपरी |महाईन्यूज|विकास शिंदे

पिंपरी येथील महिंद्रा कंपनीकडून आय टू आर अंतर्गत मिळालेल्या सहा पैकी साडेचार एकर जागेवर मुंबई मंत्रालयाच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका नव्याने नऊ मजली पर्यावरणपूरक प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. याकरिता सुमारे दोनशे कोटी खर्च अपेक्षित असून लवकरच सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या विविध नियोजित प्रकल्पांचे सादरीकरण आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी केले. यावेळी महापाैर माई ढोरे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी उपमहापाैर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डिकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक कैलास बारणे, शहर अभियंता राजन पाटील आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहराचे वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ आणि प्रस्तावित समाविष्ठ गावामुळे सध्यस्थितीत महापालिकेचे मुख्य प्रशासकीय इमारत अपुरी पडत आहे. भविष्याचा विचार करुन मुंबई मंत्रालयाच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. ही इमारत नऊ मजली राहणार असून त्याला सुमारे दोनशे कोटी खर्च अपेक्षित आहे. साडेचार एकरात ही इमारत विस्तारणार आहे. साधारणता अडीच वर्षात 72 हजार 994 स्केअर मीटर इतके इमारतीचे बांधकाम पुर्ण करण्यात येईल. या इमारतीचा आराखडा सल्लागार तुषार रंगराजन यांनी तयार केला आहे.

दरम्यान, या नव्याने उभारण्यात येणा-या प्रशासकीय इमारतीत प्रत्येक विभाग प्रमुखासाठी साधारणता स्वतंत्र मिटींग रुम, वर्ग 2 आणि 3 च्या कर्मचा-यांना स्वतंत्र बैठक व्यवस्था, सल्लागारांना स्वतंत्र एरिया, विभाग प्रमुखांना अॅंटी चेंबर व्यवस्था, रेकाॅर्ड रुम, महिलांना स्वतंत्र स्टाफ, स्वीय सहायक स्वतंत्र जागा, प्रत्येकाचे स्टोअर्स, क्लासरुम, ट्रेनिंग रुम, इको फ्रेंडली इमारत आदी सोयी-सुविधा विभाग प्रमुखाच्या सुचनानूसार समाविष्ठ करण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे त्या इमारतीत पहिला आणि दुसरा मजला हा महापाैर, उपमहापाैर, सत्तारुढ पक्षनेते, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापतीसह अन्य विषय समितींच्या सभापतीचा असणार आहे. तर आठव्या मजल्यावर आयुक्तांचे दालन ठेवण्यात आले होते. मात्र, पदाधिका-यांच्या सल्लानूसार ते केबिन तिस-या मजल्यावर आणण्यात यावे, अशा सुचना पदाधिका-यांनी दिल्या आहेत. त्यामुळे सदरील नियोजित प्रस्ताव लवकरच महासभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.

इमारतीच्या मध्यभागी पिंपळ, चिंच आणि वड हे तीन वृक्ष असणार आहेत.

” पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार वाढत चालला आहे. यामुळे भविष्याचा विचार करुन महापालिकेकडून नव्याने उभारण्यात येणारी नऊ मजली प्रशासकीय इमारत अत्यंत सुसज्ज असणार आहे. त्या इमारतीत सर्व सोयी-सुविधायुक्त उभारणी करण्यात आलेली आहे. त्या इमारतीच्या उभारणीनंतर सध्याच्या इमारतीचे काय करायचे? याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आयुक्तांनी पदाधिका-यांसमोर चार पर्याय ठेवलेले आहेत. त्यावर विचारविनिमय करुन योग्य तो निर्णय लवकरच घेण्यात येईल” उषा उर्फ माई ढोरे – महापाैर, महानगरपालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button