breaking-newsराष्ट्रिय

भौगोलिक उपग्रह प्रक्षेपण वाहन “मार्क-3′ सुरू ठेवणार

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने दहा (10) जीएसएलव्ही (एमके-3) फ्लाइटचा समावेश असलेल्या भौगोलिक उपग्रह प्रक्षेपण वाहक मार्क-3 (जीएसएलव्ही एमके-3) कार्यक्रम (फेज -1) सुरु ठेवण्यासाठी 4338.20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, यात दहा जीएसएलव्ही एमके-3 व्हेइकल्सचा खर्च, आवश्‍यक सुविधा वाढवणे, कार्यक्रम व्यवस्थापन आणि प्रक्षेपण मोहीम यांचा समावेश आहे.

जीएसएलव्ही एमके -3 कार्यक्रम सुरु ठेवणे – पहिल्या टप्प्यात देशाच्या उपग्रह दळणवळण गरजा पूर्ण करण्यासाठी 4 टन वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करता येतील. जीएसएलव्ही एमके -3 कार्यान्वित झाल्यामुळे देश 4 टन वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यात स्वयंपूर्ण होईल.

अवकाश वापराबाबत सहकार्य करण्यासाठी भारत आणि ओमान यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. फेब्रुवारी 2018 मध्ये मस्कत इथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि ओमानच्या दळणवळण आणि संवाद मंत्रालयातर्फे ओमानशी हा करार करण्यात आला होता.

ह्या करारानुसार, अवकाश विज्ञान, तंत्रज्ञान, पृथ्वीचे दूरस्थ मापन-परीक्षण, उपग्रह आधारित दिशादर्शन, अवकाश विज्ञान आणि ग्रहीय परीक्षण, अवकाशयान आणि अवकाश यंत्रणेचा वापर, अवकाश तंत्रज्ञानाचा वापर या सर्व क्षेत्रात दोन्ही देश परस्पर सहकार्य करू शकतील.

या सहकार्यासाठी, दोन्ही देशांचा संयुक्त कृती गट तयार केला जाईल. यात दोन्हीकडील अवकाश संशोधन संस्थांचे पदाधिकारी आणि दळणवळण व संवाद मंत्रालयाचे सदस्य असतील. पृथ्वीचे दूरस्थ मापन-परीक्षण, दिशादर्शन, अवकाश विज्ञान अशा क्षेत्रात, अधिकाधिक संशोधन करण्यास या करारामुळे प्रोत्साहन आणि वाव मिळेल. अवकाश तंत्रज्ञानाचा मानवतेच्या कल्याणासाठी अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशात संयुक्त प्रयत्न होण्याच्या कार्यक्रमाला ह्या करारामुळे गती मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button