breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भोसरी-दिघी रस्ता झाला ‘प्रशस्त’; आमदारलांडगे यांची ‘वचनपूर्ती’

– सागर गवळी, सचिन लांडगे यांचा पाठपुरावा
पिंपरी- भोसरी-दिघी रस्त्याच्या विकासातील अडथळा दूर करून प्रशस्त रस्ता देणार, असे वचन महापालिका निवडणुकीपूर्वी स्थानिक नागरिकांना दिले होते. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करुन आमदार महेश लांडगे यांनी ‘वचनपूर्ती’ केली आहे.
भोसरी- दिघी हा तीस फूटी रस्त्यावर उताराचा भाग होता. त्यातच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेही पडले होते. परिणामी, खड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. दरम्यान, महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करावे. भोसरी-दिघी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी दिले होते.
महापालिका शहर सुधारणा समितीचे सभापती सागर गवळी याच प्रभागाचे नेतृत्व करतात. तसेच, कामगार नेते सचिन लांडगे यांनी या रस्त्याच्या कामाबाबत पुढाकार घेतला. महापालिका प्रशासकीय पातळीवर आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. परिणामी, सध्या स्थानिक नागरिकांसाठी प्रशस्त रस्ता उपलब्ध झाला आहे.
शहर सुधारणा समितीचे सभापती सागर गवळी म्हणाले की, भोसरी-दिघी शिवेवरील रस्त्याचे कामही आता आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात येणार आहे. भोसरी-दिघी रस्त्याचा काही भाग माझ्या वैयक्तिक जागेतून गेला आहे. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता पूर्ण करण्याचे आम्ही ठरवले होते. नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कायम प्राधान्य दिले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button