breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भोसरीत दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहणार

पिंपरी- भोसरी, गवळीमाथा पंपिंग विद्युत पॅनेल खराब झाले आहे. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मंगळवारी व बुधवारी भोसरी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.  

भोसरी, गवळीमाथा येथील पंपींग विद्युत पॅनेल रविवारी (दि.22) खराब झाले आहे. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याने या पंपींगवर अवंलबून असणा-या चक्रपाणी, धावडेवस्ती, लांडगेगनर, सेक्टर नंबर 1, गुरुविहार, सदगुरुनगर, च-होली व परिसर, मोशी, बो-हाडेवाडी, भगतवस्ती, गुळवेवस्ती, सेक्टर नंबर 4 आणि जयगणेश साम्राज्य या भागातील उद्या (मंगळवारी) होणारा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.  तसेच बुधवारी देखील पाणी कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.  नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसासाठा करुन काटकसरीने वापर करण्याचे आवाहन, महापालिकेने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button